
केज/प्रतिनिधी
केज दि .12 केज विधानभा मतदार संघात तिहेरी लढत होत आसुन माजी आमदार प्रथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेश आध्यक्ष जयंत पाटील यांची 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:30 वाजता खरेदी विक्री संघ मैदान धारुर रोड केज येथे सभा आयोजीत केली होती ती अतिशय उत्साहात पार पडली.या सभेमध्ये भाषण करताना मनातील जो भाव दिसत होता तो फक्त प्रथ्वीराज साठे यांचा विजय ,पक्का निर्धार म्हणजे साठे साहेबाचा विजय होय ,हा विजय करण्यासाठी बहुतांश नेते, कार्यकर्ते आपलं वर्चस्व पणाला लावु लागले आहेत , मा . खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा अतिशय निर्णायक ठरली .बीड जिल्हा कॉंग्रेस चे नुतन जिल्हाध्यक्ष यांनीही प्रथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी कंफर कसली आहे .प्रथ्वीराज साठे यांना तालुक्यात पाठिंबे भरपुर मिळु लागले आहेत त्यामुळे पारडे जड दिसु लागले आहे.या प्रचारासाठी केज,अंबाजोगाई,नेकनुर परीसरातील विविध नेते मंडळी यांनी प्रथ्वीराज साठे यांचा विजय उपस्थिती ला राहुन निश्चित केला आहे.
