केज/प्रतिनिधी
दि.17 जानेवारी केज तालुक्यातील मौजे शिरूर घाट येथील सुजाता महिला मंडळाच्या वतीने उत्कृष्ठ भिम गित सादर केले .
दिले जिवदान ज्यांनी आम्हाला कोटी कोटी प्रणाम त्या भिमाला. जेष्ठ गाईका सौ.शुकशालाबाई रतन गायकवाड, पहाडी आवजाच्या गाईका सौ.विश्रंताबाई गायकवाड व सर्व महिला मंडळ शिरूर घाट हे गाताना दिसत आहेत. शिरूरघाट येथे आदरणिय मीराताई. आंबेडकर यानी भेट दिली होती मुळातच भिम गित गायनाचा छंद असल्यामुळे येथील महिला मंडळाला स्फुरण आले.व हे गित गायन केले. नोव्हेंबर 2024 मध्ये वर्षवास या महान ग्रंथाचे वाचन समाज मंदीर येथे करण्यात आले होते. पत्रकार जयद्रथ गायकवाड यांनी ध्वनी मुद्रीत केले आहे या महिला मंडाळाला सर्व स्तरातुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे .
संविधान सन्मान परिषेदे आध्यक्ष हानुमंतराव गायकवाड: बी. एस .पो .चे नेते विजकांत मिसळे सर्व गायकवाड परिवार शिरुर घाट यांच्याकडुन विशेष कौतुक होत आहे . वरिल गित भारत देशातील प्रत्येक माणसाच्या काळजाला भिडनारे आहे म्हणुन सर्वांनी गुण गाईले आहेत.
