तालुका विधीसेवा समिती, व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने उमरी येथील मुकबधीर व मतीमंद विद्यालय येथे कायदे विषयक जन जागरण शिबीर संपन्न झाले.याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी तालुका विधी सेवा समिती जिल्हा अतिरिक्त सञ न्यायालय केज व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागरण शिबीराचे आयोजन मुकबधीर व मतीमंद निवासी विद्यालय उमरी येथे सकाळी ९-३० वाजता आयोजनकरण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी केज न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.व्ही.पावसकर मॕडम होत्या तर कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती सविता शेप,गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर सर, मुख्याध्यापिका सुर्यवंशी मॕडम,जाधव मॕडम,विधीज्ञ डी.टी.सपाटे,एस.व्ही. मिसळे,विष्णु पाटील, यादव आदींची प्रमुख उपस्थीती होती.या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीज्ञ एस.व्ही.मिसळे यांनी केले,यावेळी श्री.डी. टी.सपाटे यांनी मुलीवरील होणा-या अत्याचार व हिंसाचार या विषयावर माहिती सांगितली.श्री. एस.व्ही.मिसळे यांनी पोक्सो कायद्याबाबत उपस्थितांना माहिती सांगितली,तसेच मुख्याध्यापिका श्रीमती. सुर्यवंशी मॕडम यांनी मतीमंद,मुकबधीर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन यावेळी केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.व्ही.पावसकर मॅडम यांनी अपंग मुलांसाठी कायदेशीर सेवेबाबत व पोक्सो अॕक्ट बाबत विस्तृत अशी माहिती सांगितली.त्या म्हणाल्या की,दिव्यांगाना सर्वप्रथम आपल्या घरामधून चांगले प्रोत्साहनपर अशी वागणूक मिळाली पाहिजे तसेच समाजा मध्येही त्यांना अशीच वागणूक मिळणे गरजेचे आहे. दिव्यांगांना विश्वासात घेउन त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे,त्यात सर्वात महत्वाचे त्यांना शिक्षण देणे हे होय. दिव्यांगामध्ये जे कौशल्य आहे ते जगासमोर आणून त्यास चालना देणे गरजेचे आहे,जे की शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होवू शकते तसेच जर दिव्यांगावर अत्याचार झाला व ते प्रकरण जेंव्हा न्यायालया पर्यंत येते तर न्यायालयीन प्रक्रिया कशा प्रकारे त्या अज्ञान दिव्यांग तसेच मुलांचे नांव गुपित ठेवले जाते याची ही श्रीमती. एस.व्ही.पावसकर मॅडम यांनी सखोल अशी माहिती उपस्थितांना सांगितली.
कार्यक्रमाचे आभार शिंदे सर यांनी मानले या शिबीरास मुकबधीर मतीमंद विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसह एकूण ८५ लाभार्थी उपस्थित होते.या शिबीरा मध्ये बेटी बचाव बेटी पढाव असे बॕनरलावण्यात आले होते.

