केज दि.16 राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित दादा गट यांच्या कडुन दि .15 रोजी रात्री 07:00 वाजता धारुर चौकातुन छञपती शिवाजी महाराज चौक या दिशेने स्वराज्य सप्ताह रथ यात्रा डिजे ,बॕड च्या वाद्यात हे आयोजन करण्यात आले .रथामध्ये छञपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारुढ प्रतिमा अतिशय शोभुन दिसत होती .रथ आतिशय योग्य पध्दतीने डेकोरेशन केला होता.शिवरायांनी ज्या बुध्दीमत्तेने स्वराज्य घडवलं त्याची यशोगाथा गात रथ चालत होता.गणिमी कावा शत्रुने कितीही केला तरीत्याच पटीत सडेतोड ऊत्तर शिवरायांनी दिले.आपलं चित्र जनतेच्या हॄदयात कोरले.चंद्रकोरा प्रमाणे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली,त्यानिमित्त ही रथ यात्रा काढण्यात आली.या स्वराज्य रथ यात्रेला ऊत्स्फुर्त प्रतिसाद देत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
