केज दि.06 फेब्रुवारी सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील नाव्होली येथे ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा व वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन असे होते की दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता कृष्णा महाराज जोगदंड यांचा अतिशय सुंदर भारुडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्रसंत भगवान बाबा वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या प्रतिमेचे टाळ मृदंग व बँड लावून मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक ठेवण्यात आले, सकाळी 11 वाजता ह.भ.प केशव महाराज घुलेटाकळीकर यांचे अतिशय सुंदर असे अमृततुल्य कीर्तन झाले, त्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला.या सर्वच कार्यक्रमाचा आनंद नाहोलीकरांनी घेतला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नंदकिशोर जी मुंदडा (काकाजी) व भारतीय जनता पार्टी केज चे तालुकाध्यक्ष भगवानरावजी केदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे नियोजन नाहोलीचे सरपंच रंजीत बप्पा बिक्कड, एलआयसी एजंट सूर्यकांत बिक्कड,बालाजी बिक्कड (सावकार) , पोलीस बॉईज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपा सोशल मीडिया केज तालुका संयोजक ईश्वर बिक्कड, इंजिनीयर अनंत बिक्कड, इंजिनियर, संदीप बिक्कड शालेय समितीचे अध्यक्ष भरत बिक्कड, वसंत बापू बिक्कड, बन्सी बप्पा बिक्कड, संजय बिक्कड,प्रदीप बिक्कड, (सावकार) रमेश सतेश बिक्कड, व विलास बिक्कड,अंगद देशमुख, बाळासाहेब देशमुख बालाजी बाबुराव लक्ष्मण शिंदे,शिवराज बावळे, हनुमंत बावळे, रावसाहेब देशमुख, खंडू नाना बिक्कड,सतीश छत्रभुज बिक्कड, व समस्त गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमा ला सहकार्य केले…!!

