केज दि.07 फेब्रुवारी सविस्तर व्रत्त असे की मौजे राजेगांव जि.प.प्रा.शाळा राजेगाव या शाळेने इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंदनगरीची स्थापना केली. एक दिवशीय आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला .या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने बाजारामध्ये जे पदार्थ विक्रीसाठी येतात फळे येतात उदाहरणार्थ बऱ्याच विद्यार्थ्यांनी वडापाव ,भेळ, इडली, डोसा, गुलाबजामून ,भजे ,चिवडा ,द्राक्ष ,केळी ,सफरचंद ,जेवढे आवडते पदार्थ आहेत तेवढे बनवण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट केलेला आहे .ज्याप्रमाणे बाजारामध्ये प्रत्येकाला आपला बाजार करून जाण्याची घाई असते त्याच पद्धतीने आज राजेगाव नगरीमध्ये हनुमान मंदिर सभागृहात हा आनंद नगरीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला .या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका मोराळे मॅडम सहशिक्षिका काळे मॅडम ,मदतनीस मीना मॅडम, मेटे वस्ती जिल्हा परिषद च्या कदम मॅडम, तसेच अंगणवाडी शिक्षिका पुष्पा मॅडम, बिस्मिल्ला मॅडम, मदतनीस रमल जाधव यांनी सहकार्य केले .या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमासाठी हनुमान विद्यालय राजेगाव येथील पाचवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी खरेदीसाठी सहभाग घेतला शिक्षक वृंद विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थाचे खरेदी करून स्वाद घेतला व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आजी-माजी पदाधिकारी तरुण मित्र मंडळ पत्रकार बांधव यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
