
केज /प्रतिनिधी
केज दि .24 केज शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर आसणार्या श्रीकृष्ण मठ येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वद्य (कृ.)आष्ठमी निमीत्त गुरूवार दि 24 आॕक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते 01 वाजता श्री. ह.भ.प.विद्वतरत्न भगवान महाराज शास्त्री(वरपगांवकर) यांचे हरी किर्तन व नंतर महाप्रसाद हा कार्यक्रम संपन्न झाला प्रत्येक महिन्याच्या वद्य आष्टमी ला किर्तन सेवा केली जाते गायनाचार्य ठोंबरे महाराज महादेव महाराज ,मृदंगाचार्य गणेश महाराज,आरोग्य सल्लागार बबन ढाकणे , आन्नदाते भगवान किसन सारूक ,नारायण नाना घुले, दरवर्षी प्रमाणे अपंगाची दिपावली साजरी व्हावी हा ऊपक्रम दि. 04 नोव्हेंबर रोजी करण्याचे आयोजन केले आहे,तरी दिव्यांग बांधवांनी दि. 02 नोंव्हेबर पर्यंत नांव नोंदणी करुन पास घेणे बंधनकारक आहे असे आव्हान भागवत भुषण ह.भ.प. श्री .केशव महाराज शास्त्री व भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांनी केले सर्वाचे आभार केशव महाराज यांनी केले.पंचक्रषीतील भगवान श्रीक्रष्ण भक्त परिवार उपस्थीत होता.
