
केज दि. 28 (अमोल सावंत) केज तालुक्यातील नाभीक महामंडळाची बैठक केज येथे पार पडली .या बैठकीत सांगोपांग चर्चा होउन नवनियुक्त पदाधिकार्यांची निवड करण्यात आली ती खालीलप्रमाणे ,तालुका अध्यक्ष पदी नवनाथ दत्तात्रय टोपे व युवक अध्यक्षपदी अविनाश दिलीप काळे आणि कर्मचारी तालुका अध्यक्षपदी विजय शिंदे सर व उपाध्यक्षपदी अनिल ठोंबरे सर यांची निवड केज येथे पार पडलेल्या नाभिक महामंडळाच्या बैठकीमध्ये झाली. केज तालुक्यातील नवनियुक्त पदांची निवड मराठवाडा संघटक कविराज कचरे मराठवाड्याचे अध्यक्ष युवराज शिंदे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे जिल्हाध्यक्ष दिलीप झगडे. युवक जिल्हाध्यक्ष हरिष वाघमारे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष दीपक सुरवसे आदींच्या उपस्थितीत केज मध्ये पार पडली. यामध्ये जिल्हा संघटक पदी अनंतराव राऊत केज तालुका अध्यक्षपदी नवनाथ टोपे, तात्या टोपे युवक अध्यक्षपदी, अविनाश काळे कर्मचारी ,अध्यक्ष विजय शिंदे सर व उपाध्यक्ष अनिल ठोंबरे सर ,तालुका संघटक पदी संजय दळवी ,युवक तालुका कार्याध्यक्षपदी महादेव काटके ,युवक तालुका संघटक प्रमोद राऊत ,युवक शहराध्यक्ष दादासाहेब राऊत युवक तालुकाप्रमुख अशोक पवार व शहराध्यक्षपदी फेरनिवड मनोज काळे यांची करण्यात आली आहे अशा प्रकारे केज येथे बैठक घेऊन निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला या बैठकीसाठी केज तालुक्यातील वडगाव, विडा, नांदूर ,पैठण ,बनकरांजा, होळ ,माळेगाव, साळेगाव, सातेफळ, पिंपरी, लाखा, सारणी सांगवी इत्यादी ठिकाणाहून समाज बांधवांची उपस्थिती लाभली.
