केज /प्रतिनिधी
दि.05 मार्च केज तालुका संपुर्ण दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या मार्फत केज तालुका अध्यक्ष श्री शंकर जाधव , माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब , किसान सेल चे तालुका अध्यक्ष सी बी एस ईनामदार साहेब उर्फ चाॕंदसाहेब ,सुरेश तात्या ,डॉ उत्तम खोडसे ,यांच्या सह सर्व पदाधिकारी यांच्या ऊपस्थीत तहसीलदार अभिजीत जगताप सर यांना निवेदन देण्यात आले.विशेषतः दुष्काळ परीस्थीती निर्माण झालेली आहे ,आदेश आले आहेत परंतु शासन मात्र मुग गिळुन गप्प आहे .कुठल्याही प्रकारची आमलबजावणी नाही.पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आजुन टॕंकर लावलेले नाहीत ,शासन बोअर अधिग्रहन करते ती प्रोसीझर नाही चालंलय काय आसा प्रश्न जनतेच्या मनात आहे .50% पेक्षा कमी आनेवारी जॎहीर होउन ही वसुली मात्र सराऀस केली जात आहे. लाईट बील न भरल्यामुळे कनेक्शन कट केलं जात आहे.विध्यार्थ्याना फीस माफी नाही असे ज्वलंत प्रश्न घेऊन आज राष्ट्रवादी काॕंग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले ते स्वीकारुन लवकरात लवकर आमलबजावणी करु आसे आश्वासन दिले.किसान सेल चे तालुका अध्यक्ष सी बी एस ईनामदार यांनी म्हटले की जर का लवकरात लवकर आमलबजावणी झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडु आसा ईशारा दिला आहे.
