केज/ प्रतिनीधी
दि.22 फेब्रुवारी सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील ज्या दिव्यांग बाधवांनी बीड चंपावती प्राथमिक विध्यालय नगर रोड बीड येथे दि. 10 डिसेंबर 2023 रोजी वेळ सकाळी 09:00 ते 05:00 या वेळेत जयपूर फूट तपासणी शिबिरामध्ये आपल्या हात किंवा पायाची तपासणी यशस्वी रित्या केली आहे, लाभार्थी चे मोजमाप घेण्यात आले होते ते साहित्य आता तयार झालेले आहे व ते पाठवून देण्या ची व्यवस्था रत्ननिधी फाउंडेशन करीत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते जयपुर फुट हात व पाय बसवले जातील ती तारीख आपल्याला लवकर च फिक्स सांगितली जाईल अशी माहीती प्रोजेक्ट चेअरमन रो.प्रा.सुनील जोशी यांनी दिली आहे.दिव्यांग मुक्त बीड जिल्हा अंतर्गत रोटरी क्लब आॕफ बीड रोटरी डिस्ट्रीक्ट -3132व रत्ननिधी फाऊंडेशन आयोजीत जयपुर फुट कॕम्प दिव्यांगासाठी कुबड्या ,कृत्रीम हात व पाय मोफत वाटप हा उपक्रम राबविल्यामुळे दिव्यांग बांधवाच्या मनात अतिशय आनंद निर्माण झाला आहे.खरोखर आपला एखादा आवयव जर निकामी झाला तर आपल्या मनाला दुःख होते ते दुःख दुर करण्याचा निर्णय ” हर रोटेरीयन ने ठाना है,दिव्यांगता मिटाना है” या नार्याचा जयघोष केला आहे.

