चक्री वादळाने नुकसान झालेल्या सर्वंनाआर्थीक मदत द्यावी
केज दि. 26
मी श्री.सी बी एस ईनामदार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विनंती करतो की, काल रात्री दि. २५/ ५ /२०२४ रोजी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला , यात कमीत कमी दीडशे झाडे फळझाडासह जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत ,व गावातील रहिवासी आणि शेतात राहणारे शेतकरी यांचे एकूण शंभर लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे,आपणास फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु फोन न लागल्यामुळे व्हाट्सअप द्वारे आपणास माहिती देत आहोत, प्रत्येक शेतकऱ्यांचा गुरांचा चारा ,जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत ,व कमीत कमी 65 एम एम पाऊस झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहेत , त्यामध्ये शेळ्यांच्या जनावरांच्या अंगावर झाड, पत्रे पडून जखमी झालेले आहेत,शेतातील गावातील मेन लाईनचे 5/ 6 खांबे पडलेले आहेत ,आपणास विनंती करण्यात येते की ,तात्काळ अधिकारी अथवा नायब तहसीलदार यांची नियुक्ती करावी वरील सर्व बाबीचे पंचनामे करून लाभार्थ्यांना अनुदान म्हणून जाहीर करावे ,दोन वाजून तीस मिनिटांनी आपल्या कार्यालयात आज दिनांक 26 मे 2024 रोजी सादर करत आहोत कृपया वेळ द्यावी वरील सर्व वादळी वारे हे मौजे नाहोली तालुका केज जिल्हा बीड येथे झालेले आहे.
आपला सी .बी .एस इनामदार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
