
केज /प्रतिनिधी
२३२- केज विधानसभा.सार्वत्रिक निवडणुक २०२४ मधील अनुसूचित जाती राखीव मतदार संघ २३२- केज विधानसभा मधील विजयी उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज आणि निवड रद्द करणे बाबत. २३२- केज विधान सभा ही अनुसूचित जाती साठी राखीव असून मागील म्हणजे सार्वत्रिक निवडणुक २०१९ मध्ये नमिता अक्षय मुंदडा यांनी निवडणूक लढवली होती त्यात त्या विजयी झाल्या होत्या.मुळात राजकीय आरक्षणाचा उद्देश हा आहे की ज्या लोकांना राजकीय दृष्ट्या मागासलेल्या आहेत त्यांना राजकीय दृष्ट्या प्रगती साठी संधी मिळावी.एकदा राखीव जागेवर निवडून आलेला उमेदवार हा राजकीय दृष्ट्या विकसित झालेला असतो.एकाच उमेदवाराला आरक्षणाचा दोनदा म्हणजे दोन वेळेस फायदा देणे हे भारतीय संविधान मधील राजकीय न्याय आणि समान संधी चे उल्लंघन आहे.तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा भारतीय संविधान अनुच्छेद १४१ नुसार कायदा होतो.पण त्यावर इथल्या राजकीय सत्ता असणाऱ्या प्रतिनिधींनी हा कायदा हेतुस्पर केलेला नाही. तथापि, मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश का स्वतःच एक कायदा असतो तो सर्वांना लागू असतो.एकाच उमेदवाराला आरक्षणाचा नावाखाली परत परत संधी देऊन लोकशाही बळकट होण्याऐवजी घराणेशाही बळकट होईल.आणि ते भारतीय संविधान नुसार लोकशाहीला अभिप्रेत नाही. म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या इंदिरा साहनी निवड्याप्रमाणे जसे एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर तो पुढे चालू ठेवता येत नाही.त्याच प्रमाणे एकदा आरक्षणाचा लाभ घेऊन निवडणूक आलेल्या उमेदवाराला परत दुसरी वेळ निवडून येणेसाठी त्याचा निवडणूक अर्ज वैध करणे हे सर्वांना म्हणजेच आरक्षित वर्गाला समान राजकीय संधी आणि राजकीय न्याय या तत्वानुसार सांविधानिक मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.ही बाब अर्ज छाननी दरम्यान आपणास मी उमेदवार या नात्याने तोंडी आक्षेप घेतला होता पण त्यावर आपण आपले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काहीही उत्तर दिले नाही.आपण केवळ आपण चर्चा करू सांगितले होते.म्हणून आपणास लेखी तक्रार करण्यात येते की आपण अनुसूचित जाती राखीव जागा वरील एकदा आरक्षणाचा लाभ घेऊन सार्वत्रिक निवडणूक २०१९ ला निवडणूक जिंकून आलेल्या माजी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांचा दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुक २०२४ चा उमेदवारी अर्ज बाद करून त्यांची झालेली निर्वाचित निवड रद्द करावी. अशी मागणी मान्य करण्यात यावी अन्यथा तीन ते सहा दिवसांत मागणी मान्य करण्यात आली नाही तर चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज सभागृह येथे अमरण उपोषणाला बसणार आहेत असा इशारा निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी दीला आहे.
