लोकनेता न्युज नेटवर्क
केज दि.13 फेब्रूवारी सविस्तर व्रत्त असे की तहसील कार्यालयाच्या आवारातील अतिक्रमणे काढून काही महिने लोटले असतांना पुन्हा येथे अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली असल्यामुळे तहसीलदार यांनी स्वतः शासकीय गाडीतुन फिरुन परिसरातील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले आहे.अगदी काही महिन्यापूर्वीच अतिक्रमणाने घुसमट झालेल्या केज तहसील आवारामध्ये प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम राबवली आणि परिसर मोकळा केला होता. परंतू पुन्हा येथील टपरी, चहाचे गाढे, झेरॉक्स काढणारे, आॕनलाईन करणारे, भेळ-मिसळ विक्रेते, वडा-पाव विक्रेते, रसवंती, ज्यूस सेंटर अशा अनेक छोट्या व्यावसायिकांनी तहसिल परिसरामध्ये अतिक्रमण करुन जागा ताब्यात घेत आपले व्यावसाय थाटले आहेत.
बीड कडून केज शहरात प्रवेशाच्या वेळी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत असल्याने हा रस्ता गर्दीचा बनला आहे. त्यामुळे आहे तो रस्ताही वाहतूकीस अरुंद आहे. त्यातच पुन्हा छोटे व्यावसायिक अतिक्रमण करुन रस्ता अरुंद बनवत आहेत. त्यामुळे वाहतूकीस आणि परिसरात नागरिकांना अडचण ठरत आहे. याची दखल केजचे तहासिलदार अभिजित जगताप यांनी घेतली आसून ते स्वतः सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी शासकीय वाहनातून अलाउसिंग करत अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन केले आहे.

