दि.11 फेब्रुवारी सविस्तर वृत्त असे की सन 2023 24 या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद स्वतःचे उत्पन्नातून दिव्यांग कल्याण अर्थ राखीव 50 %टक्के निधी मधून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविणे व स्वतःचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी झेरॉक्स मशीन चा पुरवठा करणे ही योजना राबवायची असून मूकबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील 40% टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिवंगत स्त्री-पुरुषांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांनी सादर करावी आधार कार्ड झेरॉक्स मतदान कार्ड झेरॉक्स अस्थिव्यंग व मूकबधिर दिव्यांगाचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा (ग्रामसेवक यांचे )बँक पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचे झेरॉक्स , शौचालय वापराबाबतचे (स्वयंघोषित प्रमाणपत्र )उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे 90 हजार रुपये मर्यादेच्या आत )बेरोजगार असल्याबाबतचे प्रमाणपत्र( ग्रामसेवक यांचे )व्यवसायाचे ना हरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे )इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत द्यावी ही योजना 100% अनुदान तत्त्वावर असून गटविकास अधिकारी पंचायत समिती संबंधित यांच्या कार्यालयात दिनांक 7 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीपर्यंत केवळ ग्रामीण भागातील अर्ज स्वीकारले जातील. सदर योजनेचा लाभ गरजू दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर एम शिंदे यांनी केले आहे.

