केज दि.10 सविस्तर व्रत्त असे केज पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त शांतता कमिटी ची बैठक केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.प्रशांत कमलाकर महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 04:00 ठेवण्यात आली होती.
केज शहरातील व ग्रामीण भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शांतता कमिटीचे सदस्य, शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष/पदाधिकारी, राजकीय/सामाजिक व्यक्ती, व्यापारी बांधव, पत्रकार बांधव यांना शिवजयंती उत्सव-2024 निमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन केले होते.श्री .महाजन सर यांनी प्रथम आपला परिचय दिला नंतर जयंती उत्सव समिती अध्यक्ष/ पधाधिकारी,पत्रकार बांधव ,सामाजिक कार्यकर्ते यांचा परिचय करवुन घेतला व पोलीस प्रशासनाकडुन जयंती उत्सव समितीला कशाप्रकारे मदत हवी आहे . मिरवणुकीच्या वेळी काय अडिअडचणी निर्माण होतात हे जाणुन घेतले.मावळा ग्रुप चे संजुबाबा यांनी सविस्तर माहिती दिली कि केज मध्ये आजपर्यंत चार मिरवणुका निघायच्या पण यावेळी दुष्काळी परिस्थीती आहे .त्यामुळे आम्ही तीन मंडाळाने विचार विनीमय करून एकच मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले.तर यावर्षी दोनच मिरवणुका होतील हे ही स्पष्ट केले.जयंती उत्सवासाठी आजुन परवाने आर्ज आलेले नाहीत असे मतीन सर यांनी सांगीतले.पञकार बांधवाच्या वतीने पत्रकार गौतम बचुटे यांनी रोडवरील ट्रॕफीक चा प्रश्न मांडला. त्यावर महाजन सरांनी योग्य तो निर्णय घेऊ असे स्पष्ठ सांगीतले. महाजन सर म्हणाले की केज माझं कुटुंब आहे कुटुंबातला एखादा व्यक्ती जरी ऊत्सवात आडसर निर्माण करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असे ठाम मत मांडले.पोलीस प्रशासनाकडुन येणार्या सुचनाचं पालन करावे हा सर्व कुटुंबाचा ऊत्सव अाहे व्यवस्थीत पार पडला पाहीजे कुठल्याही प्रकारे गालबोट लागु नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन केले.
