केज/प्रतिनिधी
दि.24 रोजी सायंकाळी 06:30 वाजता केज तालुक्यतील मौजे चिंचोली माळी येथे सर्व ओबीसी समाज बांधव मुख्य रस्ता नागबेट ते संत सावता महाराज व नामदेव महाराज मंदीरापर्यंत रॅलीचे आयोजन करून काढण्यात आली .रॅलीमध्ये सर्व ओबीसी बांधवा समवेत ईतर ही समाजबांधव समर्थनात दिसत होते. ओबीसी पर्व आम्ही सर्व, संत सावता,संत नामदेव महाराज, जगन भुजबळ साहेब , लक्ष्मण हाके, वाघमारे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है या घोषणा देत,शेतकरी राजा डिजे च्या तालासुरात,तोफांचा आवाज करत रॅली काडण्यात आली.निसर्गाची रिमझिम चालु असताना देखील सर्व समाज बांधव डोक्याला पिवळी टोपी,आम्ही ओबीसी नावाची घालुन घोषणाबाजी करत होते.सर्व जनता आरक्षण,आरक्षण बचाव या बाबीकडे बारकाईने लक्ष देउ लागलेले आहे माञ शासन मुग गिळुन गप्प का आहे हा प्रश्न जनसामान्याच्या मनात आहे.विचाराचं काहुर माजलं आहे.घोषणा देताना राम राऊत(मेजर),अभिजित राउत ,नारारायण शिंदे,बाळासाहेब राउत,सचिन रहित,परमेश्वर राऊत,शुभम राउत यांच्या सह आदिंची उपस्थीती होती
