अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि.03 जानेवारी सविस्तर व्रत्त असे की केज येथील रहिवाशी श्री. बालासाहेब नागुराव दांगट वय 70 वर्ष यांनी केज तहसील कार्यालयाकडे रीतसर अर्ज करुन त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी सर्वे नं 100 गायराण मधील जुना केज ते कानाडी माळी रस्ता सर्वे नं 103 च्या नंबर बांधापर्यंत चा रस्ता खुला करण्यात यावा अर्ज केलेला होता त्याचा निकाल देखील त्यांच्या बाजुने लागला आहे. तहसील कार्यालयाच्या निकाला प्रमाणे रस्ता खुला करुन मिळण्यासाठी अमरण उपोषण गेली दहा दिवसापासुन दि.25 जानेवारी सुरूवात केलेली आहे. तर आज दहावा दिवस आहे प्रशासनाने सांगुन देखील रस्ता आर्धवट फक्त कपाउंड काढलेलं आहे .उपोषणकर्त्याचं आसं म्हणनं आहे की मी जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश क्र.जा.क्र./महसुल विभाग/जमा/ना.ज.त./कावि दि.06/10/2023 आणुन देखिल रस्ता मला माझ्या शेतात जाण्याकरता खुला होत नाही .प्रशासनाने वारंवार सांगुन देखील अशीच परिस्थीती आहे .म्हणुन मी पुर्ण रस्ता खुला होईपर्यंत अमरण उपोषण करणार आहे असे ठाम मत श्री.बालासाहेब नागुराव दांगट यांनी आज संवाद साधताना म्हटले आहे.मो: 7709595399
