
केज /प्रतिनिधी
केज: दि.05केज शहराजवळ अवघ्या दोन कि. मी. अंतरावर आसणार्या भगवान श्रीकृष्ण मठ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी दिव्यांग व्यक्तींना जिवनाउपयोगी साहीत्य वाटप दि. 04/11/2024 रोजी वार सोमवार दिवशी ह भ प किर्तन केसरी ,सरस्वती भुषण विनोदाचार्य श्री आदिनाथ महाराज लाड (आळंदी) यांचे किर्तन 11:00 ते 01:00 या वेळेत झाल्यानंतर 01:00 ते 02 :00 महाप्रसाद व दुपारी 02:00 नंतर साहीत्य वाटप नियोजन आयोजक ह भ प केशव महाराज शास्री यांच्या वतीने करण्यात आले आहे.गेली आठ दिवसापासुन दिव्यांग बांधवाची नांव नोंदणी करून पास देण्यात येत होते , पंचक्रषीतील बर्याच लाभार्थी यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली .नोंदणीचा शेवट दिनांक 02/04/2024 हा दिवस नोंदणी करण्याचा शेवट होता .खर्या दिव्यांग लाभार्थ्याना साहीत्यमिळणार याची उत्सुकता लागली होती ती आज रोजी पुर्णत्वाला गेली .खरोखर आसे उपक्रम राबविणे आत्यंत गरजेचे आहेत कारण घरातील कर्ता माणुस ,कुटुंबप्रमुख अपंग आपल्या कुटुंबाची दिवाळी साजरी करू शकत नाहीत त्यांना आधार नक्कीच मिळाला जाइल, तरी पंचकृषीतील पाचशे लाभार्थ्यानी लाभ घेतला. ह भ प आदिनाथ महॎराज लाड यांनी ह भ प केशव महाराज यांचं कौतुक केलं जो व्यक्ती पाचशे अपंगांना सोबत घेउन दिपावली सारखा सण साजरा करतो त्याला ईश्वर कधी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासु देणार नाही .भगवान वान श्रीकृष्ण मठ हा भविष्यात धाकटी पंढरी म्हणुन प्रसिध्दी पावेल असा अशिर्वाद दिला.हिच थोर भक्ती ||आवडती देवा || संकल्पावी माया संसाराची ||ठेविले आनंते तैसेची राहावे|| चित्ती आसु द्यावे समाधान || वाहीला उद्वेग दुःख ची केवळ || भोगनेती फळ संचिताचे|| तुका म्हणे घालु तयावरी भार || वाहु हा संसार देवा पाई || या न्ययॎाने महाराजांनी दिव्यांग सेवा रुपी भक्ती ,आणि संसाराचा भार देवावर ठेवला तो अविरत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पुर्णत्वाला गेला.या कार्यक्रमासाठी पंच कृषीतील भक्त परिवार गायक,वादक प्रतिष्ठीत नागरीक व दिव्यांग बांधवाची बहुसंख्य उपस्थिती होती.राष्ट्रीय अप़ंग विकास महससंघाचे राजयसंचालक श्री विनायक लोंढे यांनी ह भ प केशव महाराज शास्त्री यांचा सत्कार केला सर्व बांधवांच्या ऊपस्थीत महाराजानी स्वीकार केला व सर्वाचे आभार मानले,
