
केज /प्रतिनिधी
केज: दि.03 केज शहराजवळ अवघ्या दोन कि. मी. अंतरावर आसणार्या भगवान श्रीकृष्ण मठ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी दिव्यांग व्यक्तींना जिवनाउपयोगी साहीत्य वाटप दि. 04/11/2024 रोजी वार सोमवार दिवशी ह भ प किर्तन केसरी ,सरस्वती भुषण विनोदाचार्य श्री आदिनाथ महाराज लाड (आळंदी) यांचे किर्तन 11:00 ते 01:00 या वेळेत झाल्यानंतर 01:00 ते 02 :00 यावेळेत होणार आहे.महाप्रसाद दुपारी 02:00 नंतर नियोजन आयोजक ह भ प केशव महाराज शास्री यांच्या वतीने करण्यात आले आहे.गेली आठ दिवसापासुन दिव्यांग बांधवाची नांव नोंदणी करून पास देण्यात येत आहेत , पंचक्रषीतील बर्याच लाभार्थी यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली आहे.नोंदणीचा शेवट दिनांक 02/04/2024 हा आसुन नोंदणी करण्याचे आव्हान करण्यात आले होते .अवघ्या दोन दिवसात खर्या दिव्यांग लाभार्थ्याना साहीत्यमिळणार याची उत्सुकता लागली आहे.खरोखर आसे उपक्रम राबविणे आत्यंत गरजेचे आहेत कारण घरातील कर्ता माणुस ,कुटुंबप्रमुख अपंग आपल्या कुटुंबाची दिवाळी साजरी करू शकत नाहीत त्यांना आधार नक्कीच मिळाला जाइल, तरी पंचकृषीतील जास्तीत जास्त लाभार्थ्यानी लाभ घ्यावा असे आव्हान होत आहे.
