
केज/प्रतिनिधी
दि.01 केज तालुक्यातील मौजे राजेगांव येथे जि.प.प्रा शाळा राजेगांव आयोजीत बाल आनंदनगरी कार्यक्रम दि.30 /01 /2025 रोजी वार गुरूवार दिवशी उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती चे आध्यक्ष ,अनिस शेख ,पालक,गावकरी महिला पुरूष ,अणि विध्यार्थी, विध्यार्थीनी ,मुख्याध्यापीका, श्रीमती मोराळे मॅडम सहशिक्षीका काळे मॅडम ,ट्रेनी शिक्षीका पुनम कदम मॅडम यांच्या उपस्थितीत विध्येची देवता सरस्वती देवी च्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात केली.यामध्ये तब्बल 35 वेगवेगळ्या पदार्थाचे स्टॉल्स विध्यार्थ्यानी लावले होते .यामध्ये आईसक्रीम ,लाडु पाणीपुरी,भेळ,वडापाव,गुलाब जामुन,मुळकुल, चॉकलेट,मेंदु वडा ,भजे,शेवचिवडा, इत्यादी पदार्थ विक्रिला होते, या खरेदी विक्रीतुन करीत कमी पाच ते सहा हजार रू ऊलाढाल झाली. हनुमान विध्यालय राजेगांव येथील सर्व विध्यार्थी ,सहशिक्षक बिक्कड सर, बनसोडे सर यांनी हजेरी लावली .या कार्यक्रमामध्ये बालकांना उत्साह देण्यासाठी बहुतांश जेष्ठनागरीक ,शिक्षणप्रेमी ,जि प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका,सहशिक्षीका,ट्रेनिशिक्षीका ,माता पालक यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले.
