
केज दि.06/10/2024 रोजी पुरोगामी पत्रकार संघ सलग्न दिव्यांग सेल ची कार्यकारीणी शासकीय विश्राम ग्रह केज येथे ठिक सकाळी 11:3 वाजता पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य प्रसिध्दी प्रमुख श्री. दत्तात्रय मुजमुले यांच्या आध्यक्षतेखाली निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महसंघ राज्य संचालक श्री .विनायकरावजी लोंढे सर, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष (जेष्ठ पत्रकार)श्री.मनोराम बाबुराव पवार, प्रहार संघटनेचे श्री.महादेव डोईफोडे व बहुसंख्य दिव्यांग बांधवा च्या उपस्थीतित कार्यक्रम पार पडला.संघटना म्हणजे एकाच विचाराने प्रेरीत होउन एकाच उद्धेशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात .अनुकुल परिस्थीतित शंभर डोकी म्हणजे संघटना नाही तर प्रतिकुल परिस्थीतित साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना हा विचार दिव्यांग बांधवांनी आत्मसात केला. श्री .दत्तात्रय मुजमुले यांनी कार्यकारीणी जाहीर केली ती अशी, केज दिव्यांग सेल तालुका अध्यक्ष,श्री.अमोल किसन सावंत,उपाध्यक्ष,सुरेश गोरे ,उपाध्यक्ष ,सुखदेव कापरे, सहसचिव,वसुदेव सारुक ,संघटक ,अशोक शिंदे, सहसंघटक ,आसाराम घुले,शहराध्यक्ष,शिवराम घुले ,सदस्य विकास घोडके,थोरात प्रल्हाद,गायकवाड महादेव,कसबे शिवाजी,बिक्कड फुलचंद,शिंदे भगवान,क्षीरसागर गोकुळ,तांदळे अशोक, सुरेश गदळे, दिलीप वाघमारे ,सदस्या दिक्षा वाघमारे ,मदिना शेख ,स्वर्णमाला शिंदे यांची निवड करण्यात आली.
