
केज/प्रतिनिधी
दि.30 सप्टेंबर केज तालुका पुरोगामी पत्रकार संघ सलग्न कला क्रीडा विश्व समिती कार्यकारीणी बैठक दि.29/09/2014 रोजी शासकीय विश्राम गृह केज येथे पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री.दत्तात्रय मुजमुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.पुरोगामी पत्रकार संघ सलग्न कला क्रीडा विश्व समितीच्या केज तालुका अध्यक्षपदी अनिल वैरागे (बापु) तर उपाध्यक्षपदी दिलीप खाडे ,सचिवपदी सचिन लांडगे,सहसचिव मुनीरभाई कुरेशी ,सल्लागार बलभीम मस्के ,सहसल्लागार शेख इकबाल,शहर अध्यक्ष प्रदिप हाजारे,शहर सचिव अनुज रोकडे ,शहर सचिव किशोर भांडे ,संघटक शेख चुनूनिया ,सहसंघटक दिपक खाडे सदस्य शिवमुर्ती हाजारे यांच्या निवडी करण्यात आल्या,तसेच महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी पुजा घाडगे , महिला संघटक सिंधुताई मुळे ,शहर अध्यक्ष अनिता कसबे,शहर संघटक छबु अंधारे यांच्या निवडी करुन नियुक्तीपञ देण्यात आले.यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य प्रसिध्दी प्रमुख तथा जिल्हाअध्यक्ष श्री .दत्तात्रय मुजमुले ,तालुका अध्यक्ष रंजीत घाडगे,सचिव दिनकर जाधव,उपाध्यक्ष मनोराम पवार यांच्यासह ईतर मान्यंवर उपस्थीत होते.
