केज/प्रतिनिधी
दि.17 केज तहसील कार्यालय येथे निवडणुक निर्णय अधिकारी दिपक वजाळे सर यांच्या आध्यक्षतेखाली आदर्श आचार संहिता आमलबजावणी अनुषंगाने आढावा बैठक दुपारी 03;00 वाजता घेण्यात आली. बैठकी मध्ये विविध प्रश्नावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.232 केज विधानसभा मतदार संघ निववडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आदर्श आचार संहिता पालन काटेकोर पणे करण्यात यावे या साठी सर्व पत्रकार ,संपादक,इलेक्ट्रॉनिक मिडिया,,प्रिंट मिडिया यांच्या माध्यामातुन प्रसिध्दी करण्यासाठी सर्वांना प्रेस नोट द्वारे कळवण्यात आले होते.सर्व जणांची उपस्थिती लाभली.केज तालुक्यात एकुण 420 बुथ केंद्र आसुन या सर्व बुथावर दिव्यांग व्यक्ती,वयोवृध्द , महिला मतदार यांची गैरसोय होउ नये म्हणुन शासन सर्वोपरी उपाययोजना आखत आहे. काही बुथ केंद्र संवेदन,अतिसंवेदनशील आसुन त्या ठिकाणी काही गैरप्रकार घडतो का याची दक्षता घेऊन त्वरीत संपर्क आमच्याशी ,तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान दिपक वजाळे सर निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अंबाजोगाई ,प्रियंका टोगणे,रावसाहेब सर,केज तहसीलदार श्री राकेश गिड्डे सर ,नन्वरे सर, सर्व कर्मचारी आणि बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थीत होते.
