लोकनेता न्युज नेटवर्क
केज दि.22(अमोल सावंत) केज तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान मांडले आहे .मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडटात धोधो पाऊस पडत यामुळे जनसामांन्य, शेतकरी यांचे फार नुकसान होउ लागले आहे.दि.21/10/1024 रोजी दुपारी 01:30 वाजेच्या सुमारास काळेकुट्ट अभाळ आले ,सुसाट्याचा वारा वीजेच्या कडकडात पाउस जोरदार सुरु झाला. मौजे तरनळी येथे शेतीवर आधारीत जोडधंदा आसणारा शेळीपालन ग्रामीण भागामध्ये केला जातो आशाच प्रकारे तरनळी येथील अभिमान सारुख हे आपल्या शेळ्या घेउन शेतात चारण्यासाठी गेले असता दुपारी वीज पडुन त्यांच्या दोन बकरे व एक शेळी यावर वीज कोसळुन जागीच मृत्यु झाला या घटनेने तरनळी गावात हळशळ व्यक्त होत आहे.शासना मार्फत त्यांना आर्थीक मदत मिळण्याचे आव्हान हो आहे.तसेच मौजे नाव्होली येथे खंडोबाच्या मंदीराजवळ आसणार्या ओड्याला पानी भरपुर आल्याने नांदुर केज जारा मुख्य रस्ता आर्धा तास ठप्प होता ,नांदुर केज बस पानी आसल्याने पावसात जाग्यावर उभी केली वाहतुक ठप्प झाली . प्रवाशाचे हाल झाले.
