केज/प्रतिनिधी
दि.01 आॅगस्ट मौजे कापरेवाडी येथील दाम्पत्य लग्न समारंभ उरकुन आपल्या गांवी कापरेवाडी येण्यासाठी केज बस स्टॅंड येथे शुक्रवारी दुपारी 04:00 वाजेच्या केज नांदुर या बस गाडीची वाट पहात होते.सौ.सुमलबाई रामेश्वर कापरे मु.कापरेवाडी या महिले शेजारी एक अनोळखी महिला येउन बसली.पती रामेश्वर कापरे बस लागली का इकडे पहात होते ,आनोळखी महिला सुमलबाई कापरे महिलेला बोलु लागली ,का आत्ताच थोडावेळ झालं दोन महिला रडत चालल्या होत्या,त्यांच्या गळ्यातील असणारे दागीने चोरटे घेउन गेले तुमच्या गळ्यातील दागिने काडुन ठेवा असे म्हटल्या बरोबर सुमलबाई कापरे यांनी आपल्या गळ्यातील दगिने कडुन पर्स मधे ठेवले बराच वेळाने केज नांदुर बस गाडी आली बस मध्ये चडताना महिला जास्त गर्दी करतात अशीच स्थिती केली .सुमलबाई च्या लक्षात आपले दागिने सुरक्षीत आहेत .पण त्या आनोळखी महिलेने कशी भुरळ पाडली, का पावडर टाकली काहीच कळलं माझे बोरमाळ,घन्टन ,मंगळसुत्र,जवळ जवळ पंधरा ग्रॅम सोने लंपास झाले आहे अशी माहिती सौ. सुमलबाई कापरे यांनी दिली.केज पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे पुढील तपास चालु आहे.दिवसें दिवस ,वाढत चाललेली लुटमार गेल्या आठ दिवसापुर्वीच बाजार दिवशी तीन फोर्जी मोबाईल तीन चोरीला गेले त्यामध्ये एक महिला रंगेहात पकडण्यात आली.महीला वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.मुख्यमंञी लाडकी बहीण योजना,शिलाई मशीन फार्म भरण्यासाठी देखील महिला तालुक्याच्या ठिकाणी येत असुन मोठी गर्दी दिसत आहे.प्रशासनाने या बाबीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे असा सूर जनतेतून उमटत आहे.

