केज/ प्रतिनिधी
केज दि.30 मौजे राजेगांव येथील प्राथमीक आरोग्य केंद्र येथे रूग्ण कल्याण समिती ची बैठक सकाळी 11:00 वाजता आयोजीत करण्यात आली .या बैठकीच्या आध्यक्षस्थानी केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले सरांची उपस्थीती लाभली.वैध्यकिय अधिकारी डॉ.मुंडे सर यांनी अध्यक्षीय केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आठवले सरांचा स्वागत शाल,पुष्पगुच्छ देउन केले,नंतर सरपंच सौ .सुशिला अविनाश मस्के यांचे स्वागत सिस्टर ससाने मॅडम व ढाकणे मॅडम यांनी केले,व ग्रामपंचायत सदस्य,अमोल सावंत यांचे स्वागत वैध्यकीय अधिकारी डॉ.ढेंगळे सर यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी यांनी उपस्थीत सर्व कर्मचार्यांशी संवाद सादत प्राथमीक आरोग्य केंद्राला रूग्ण कल्याणासाठी काही अडचणी आहेत का ,साहित्याची कमतरता आहे असा प्रश्न प्रत्येक डिपार्मेंट च्या कर्मचार्याशी संवाद साधुन केला.प्रत्येक कर्मचार्यांने देखील आत्यावश्यक लागणार्या साहित्याची मागणी केली ,त्यावर डॉ.आठवले सरांनी होकार देखील दिला.रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा मानुन प्रत्येकाने आपापले कार्य प्रमाणिकपणे करणे गरजेचे आहे असा मोलाचा संदेश दिला.सुञसंचालन श्री.वसंत सरांनी ,व आभार श्री .सावंत सरांनी करुन बैठक संपन्न झाली असे जाहीर केले.

