केज /प्रतिनिधी
दि.29 केज शहरांमध्ये दि.28/09/2024 रोजी कामगार विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत चित्रफिती द्वारे जनसामान्यांमध्ये जनजागृती ह्वावी म्हणुन रथ यात्रा काडण्यात आली.खर्या आर्थाने जो कामगार बांधव आहे काम करत आसुन त्याची माहीती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर भरली जात नाही मात्र जे कामच करत नाहीत त्यांची माहीती संकेत स्थळावर अगोदर असते.क्वचित काही बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनाची माहीती आहे म्हणुन कामगार विभागाने चित्रफितीद्वारे सर्वांना माहीती मिळण्यासाठी रथयाञा अभियान सुरु केले. बांधकाम कामगारांना विमा कवच, पाल्यांना शिक्षणासाठी आर्थीक मदत ,आणि आरोग्य यासाठी शासन सर्वोपरी लाभ देत आहे हा खर्या कामगारांपर्यंत पोहचावा ही भावना ठेऊन हा संकल्प हाती घेतलेला आहे .यामध्ये जनसामांन्य लोक कुतुहलाने माहीती संपादन करू लागले आहेत.WWW.Mahabocw.in या संकेतस्थळावर जाउन आपली माहीती भरावी किंवा जास्तीचि माहीती हवी असेल तर जिल्हा किंवा तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा,केज शहरामध्ये अंबाजोगाई रोड स्टेट बैंक आॕफ इंडिया समोर इंगळे कॉम्पलॕक्स येथे तालुका कार्यालयाचे आॕफीस चालु करण्यात आले आहे तरी गरजवंत कामगार बांधवानी याचा आवश्य लाभ घ्यावा असे आव्हान कामगार विभागामार्फत करण्यात येत आहे.

