केजदि. रेशन दुकानदारावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल 20,000(वीस हजार रू) लाच घेतल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात आडकले. अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारोती माने अशि अनुक्रमे नावे आहेत.दोघेही तहसील कार्यालय येथे कार्यरथ आहेत.तक्रारदरा कडुन (40,000 रू ) मागणी करून (20,000)रू स्वीकारताना प्रतिबंध विभागाच्या
सापळ्यात आडकले.माने कोतवाल अभिजीत जगताप यांचे हाप्ते गोळा करत आहे अशी माहिती धाराशिव लाचलुचपत प्रतिबंध विभागाला लागल्या बरोबर सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले .केज तहसील कार्यालयाची आब्रू चव्हाट्यावर आणली. अभिजित जगताप यांचा विश्वासु माणुस समजला जाणारा माने कोतवाल जेरबंद करण्यात आला व केज तहसील कार्यालयचे तहसीलदार अभिजीत जगताप हे फरार झाले आहेत .पुढिल तपास चालु आहे.

