केज/प्रतिनिधी
दि.16 केज तहसीलचे कामकाज गेली पाच ते सहा दिवसापासुन बंद आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या आडचणी वाढतआहेत .शैक्षणीक वर्षासाठी लागणारे उत्पन्न, डोमासाईल, नॉन,सर्टिफीकेट मिळण्यास दिरंगाई होऊ लागली आहे.अशातच कोतवाल संघटना केज यांनी महसुल कर्मचार्याच्या राज्यव्यापी बंद ला उत्स्फुर्त प्रतिसाद देत जाहीर पाठिंबा देण्याचे निवेदन मा .तहसीलदार सचिन देशपांडे सर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. कोतवाल संघटना तृतीय श्रेणीतुन चतुर्थ श्रेणीत प्रमोशन करण्यात यावे यासाठी सर्व कोतवाल संघटना एकञ येत संपाला सर्वानुमते पाठिंबा दि. 15/07/2024 रोजी देण्यात आला.निवेदनावर खालील प्रमाणे स्वाक्षर्या आहेत.इंगळे अमोल अशोक ,तांबोळी खदीर,सचिन सुरवसे,पवार गोपाळ,पवार के .आर.,घाडगे ए.बी.,जाधव एस.एस.,टोपे एन .पी.,राउत व्हि. एम.,गवळी प्रशांत,हाजारे श्रीकांत,शेख महेबुब,कोरडे दत्तु,उमेश बावरे,काझी नझीमोद्दीन,एस .एस .येलमेळकर,जे. एस .राउत,जी.आर.डबरे.

