केज/प्रतिनिधी
शहरातील वारंवारित खंडित होणारा वीज पुरवठा व कमी दाबाने कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा या नागरिकांच्या समस्यांची दखल खा. बजरंग सोनवणे यांनी घेऊन वीज वितरणचे अधिकाऱ्यांना नवीन उच्च क्षमतेच्या चार रोहीत्राचा प्रस्ताव तयार करून मंजूरीसाठी पाठविण्याचे कळविले आहे.केज शहरातील शिक्षक कॉलनी, अहिल्या नगर, सब स्टेशन आणि दूध डेअरी या भागात अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे तसेच तो वारंवार खंडित होत असल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान या भागातील नागरिकांनी खासदार बजरंग सोनवणे यांची भेट घेऊन ही समस्या सोडवण्याची मागणी केली. त्या नुसार खा. बजरंग सोनवणे याची तात्काळ दखल घेत विज वितरण विभागाशी संपर्क साधून या भागातील समस्या सोडविण्यासाठी २०० के व्ही क्षमतेचे चार विद्युत रोहितत्राचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविले आहेत. लवकरच चार नवीन रोहित मिळणार असल्याने या भागातील नागरिकांची विजेची समस्या कायमची सुटणार आहे.

