केज /प्रतिनिधी
दि.२७ मार्च २०२४ रोजी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन मौजे काळेगांवघाट ता.केज येथे सकाळी ०९-०० वाजता आयोजित करण्यातआले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केज न्यायालयाचे चौथे सहदिवाणी न्यायाधीश श्री.के.एन. निवडंगे होते.कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री. ए.एस.राठोड,पाणी फाउंडेशनचे श्री.संतोष शिनगारे,उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.कमलाकर ढाकणे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.डी.के. नाळवंडीकर,गावचेसरपंच अविनाश गाताडे,जेष्ठ विधीज्ञ डी.टी.सपाटे, एन.आर.शिंदे,एस.व्ही. मिसळे,व्ही.बी.पाटील,
पी.डी.इतापे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यकमा चे सूत्रसंचालन एस.व्ही. मिसळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना डी.टी.सपाटे यांनी केली. यावेळी डी.टी.सपाटे यांनी शासकीय विविध योजने बाबत उपस्थितांना सविस्तर अशी माहिती सांगितली.एन.आर.शिंदे यांनी अन्न आणी शिक्षणाचा अधिकार याविषयी विस्तृत अशी माहिती सांगितली. जागतिक पाणी दिवस, जलसंवर्धन,प्रदुषण मुक्त पाणी आणि हवा या विषयावर बोलताना पाणी फाउंडेशनचेश्री.कमलाकर ढाकणे यांनी विस्तृत व उपयुक्त अशी माहिती उपस्थितांना सांगितली.ते म्हणाले की,पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे.ते आपले मूळ स्त्रोत आहे.पाण्याच्या अभावा मुळे अनेक समस्या येवू शकतात.पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येवू शकते,त्यासाठी सर्व नागरिकांनी याचे महत्व समजून घेवून जलसंवर्धन करावे.पाण्यामुळे येणा-या तक्रारी गावाच्या गावातच मिटवाव्यात.तसेच पाण्या विषयी ज्या काही शासकीय योजना आहेत. त्याचा फायदा घेऊन विहीरीचे,बोअरचेपुर्नभरण करुन घ्यावे.पाण्याबाबत वेळीच जागृत होऊन जल संवर्धन करणे, जास्तीत जास्त झाडे लावणे या विषयी श्री.शिनगारे यांनी मोलाचा सल्ला दिला. तसेच पाण्यामुळेच तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता यावेळी त्यांनी बोलुन दाखवली. अध्यक्षीय समारोप करताना चौथे न्यायाधीश श्री.के.एन.निवडंगे यांनी जागतिक पाणी दिवस
जल संवर्धन,प्रदुषण मुक्त पाणी आणी हवा शासकीय विविध योजना तसेच अन्न आणी शिक्षणाचा अधिकार याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन लाभार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे आभार ग्रामसेवक नखाते सर यांनी मानले.कार्यक्रमास गावातील जेष्ठ नागरीक मंडळी,महीलांसह ८५ लाभार्थी उपस्थीत होते.

