केज/प्रतिनिधी
केज दि.27 मौजे राजेगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळ यांच्या वतीने तुकाराम बीज निमित्त करण्यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी आनंदात कार्यक्रम सुरुवात करण्यात आला .विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज (उत्तरेश्वर पिंपरीकर )यांच्या हस्ते उद्घाटन करून या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली .तब्बल 29 वर्ष आज चालू आहे ही परंपरा सर्व गावकरी मंडळींनी राखली आहे . कार्यक्रमाची रूपरेषा आज दिनांक 27 /3 /2024 रोजी हरिभक्त परायण श्री .नारायण भाऊ महाराज यांचे संध्याकाळी 9 ते 11 या वेळेत कीर्तन होईल. दिनांक 28 /03/2024 रोजी हरिभक्त परायण गोवर्धन महाराज कोरडे ,दिनांक 29/ 3 /2024 रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पवार ,दिनांक 30/ 3/ 2024 रोजी हरिभक्त परायण श्री .विष्णुपंत महाराज लोंढे, दिनांक 31/ 03/ 2024 रोजी हरिभक्त परायण विनायक महाराज काचगुंडे, दिनांक 01/ 04/ 2024 हरिभक्त परायण श्रीराम महाराज चोले, दिनांक 02/04/ 2024 हरिभक्त परायण केशव महाराज घुले शास्त्री व दिनांक 03/04/ 2024 रोजी हरिभक्त परायण श्री .गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे (मठाधिपती बंकट स्वामी संस्थान नेकनूर )यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10:00 ते 01:00 या वेळेत होईल तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्ताने या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा अशी संयोजकाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

