केज दि.06 फेब्रुवारी सविस्तर व्रत्त असे कि केज तालुक्यातील साळेगांव येथील दै सामना ग्रामीण प्रतिनिधी यांना घर बांधण्यासाठी तालुक्यातील पञकार बाधवांचे सहकार्य लाभले त्या अनुशंगाने सर्व पत्रकार बांधवांना ग्रह प्रवेश कार्यक्रमासाठी आमंञण दिले.दि.05 फेब्रूवारी रोजी सर्व पञकार बांधव उपस्थीत होते.सर्व पञकार यांच्या वतीने पञकार हनुमंत भोसले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आयोजकाच्या वतीने पत्रकार गौतम बचुटे यांनी त्या कुटुंबाची अत्यंत वाईट परिस्थिती होती . बेघर असताना त्यांनी लोकांचे कर्ज काढून आणि हात-उसने पैसे घेऊन स्वतःचा राहण्या पुरता निवारा केला आहे. हे प्रत्यक्ष जानले होते मनातला भाव व्यक्त केला. खरोखर पञकार समाजात घडणार्या घटना आपल्या वर्तमान पत्रात वाजवितात पण आज पत्रकाराने पत्रकारांना बस स्टॅन्ड पासुन गाजवत आपल्या घरापर्यंत आनले. सर्व पञकार बांधवांच्या वतीने त्या कुटुंबाला भारतरत्न डॉ.बाबासाहेबां प्रतिमा भेट दिली. ज्योतिकांत कलसकर हे देखील व्यक्त झाले. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा ईमानदार कार्यकर्ता आहे.सर्व पञकार बांधवाच्या सहकार्यामुळे आज हे घर उभा राहिले आहे आसं ठाम मत मांडले.सुरसंगम डिजे चे मालक यांनी पञकार बांधवांना मोफत सेवा देउन वाजवत गाजवत आणलं त्यामुळे जावेद भाई चं देखील आभार मानले.उपस्थीत पत्रकार सनी भाई, पञकार मुब्बशीर शेख यांनी लाईट फिटी़ग करून देण्याचे आश्वासन दिले.

