केज/प्रतिनिधी
केज दि 22: तब्बल दोन दशके केज तालुक्यातील रुग्णांची सेवा करून ‘विश्वासू डॉक्टर’ म्हणून केजवासीयांच्या ह्रदयात कायमचे स्थान मिळवणारे प्रसिद्ध डॉक्टर ए. बी .देशपांडे यांचे वृधोपकाळाने गुरुवारी दुपारी अंबेजोगाई येथे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
डॉ .ए. बी देशपांडे साहेब यांनी 1995 ते 2014 या काळात केज मध्ये प्रदीर्घ रुग्ण सेवा केली. सुरुवातीला ते केज च्या शासकीय तालुका रुग्णालयाचे अधीक्षक होते. त्यानंतर सेवनिवृत्तीनंतरही त्यांनी केजवासीयांच्या आग्रहास्तव केज मध्ये कानडी रोड व रोजा मोहल्ला रोड येथे त्यांनी केजच्या गरीब व गरजू रुग्णांसाठी खाजगी सेवा दिली. त्यांच्यावर रुग्णांचा मोठा विश्वास होता. ते उत्कृष्ट गायकही होते. केजच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांच्या उत्कृष्ठ रुग्णसेवेसाठी केज रोटरीने त्यांना सन 2000 चा ‘केजभूषण’ पुरस्कार देऊन गौरवीत केले होते. रुग्णसेवेसाठी इतरही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच केज शहरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी 8 वाजता अंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
डॉ ए बी देशपांडे साहेब यांना केजवासीयांची भावपूर्ण श्रद्धांजली….!

