केज/प्रतिनिधी
केज दि.21 शेतात सोयाबीनच्या पिकातील तण काढीत असलेल्या अनुसूचित जातीच्या विवाहित महिलेचा गावातील एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १७ ऑगस्ट रोजी केज तालुक्यातील एका गावात एक अनुसूचित जातीची महिला व तिची भावजई या दोघी सोयाबीनच्या पिकातील तण काढीत होत्या. त्यावेळी दुपारी २:१५ वा. आनंद सुधाकर कातमांडे हा शेतात तिच्या पाठी मागून जाऊन तिच्याशी झोंबाझोंबी केली. व तिच्याशी ओढाओढी करून तिला खाली पडले आणि विनयभंग केला. तसेच ती त्याला आवडते असे सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्या महिलेने आरडाओरड केल्या नंतर तिची भावजई आली. पीडित महिलेची त्याच्या पासून सुटका करीत असताना आनंद कातमांडे याने तिला शिवीगाळ करून चापटाने मारहाण केली. आणि खोटा गुन्हा दाखल करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे पीडित महिला घाबरून गेली होती. तसेच तिचे पती व वडील घरी नव्हते. दि.१९ ऑगस्ट रोजी पीडित महिलेच्या तक्रारी वरून आनंद कातमांडे यांच्या विरुद्ध केज पोलिसात गु. र. नं. ४५९/२०२४ भा. न्या. सं. ७४, ७५, ७६, ७८, ७९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.

