केज /प्रतिनिधी
दि. 13 सप्टेंबर सध्या विधानसभा बिगुल वाजणं जवळ जवळ आलेले आहे अशातच निवडणुक रिंगणांमध्ये नवनवीन चेहरे आपली बाजु भक्कम करण्यास कसोटी ने प्रयत्न करत आहेत .प्रहार जनशक्तीच्या वतीने धारुर चे रहिवाशी श्री. रघुनाथ तोंडे प्रहार जनशक्तीचे बीड जिल्हा अध्यक्ष यांनी माजलगांव तालुक्यातील गावागावात जाऊन भेटी गाटी चा उपक्रम चालु केला आहे. माजलगांव तालुक्यात जवळ जवळ प्रहार जनशक्ती च्या 200 शाखा आहेत सर्वांनुमते ,दिव्यांग ,वंचित ,निराश्रीत , दुर्बल घटकांच्या समस्या सोडवण्या साठी उमेदवार प्रमाणीक आहे याची खात्री असल्यामुळे ही फौज त्यांना सर्वोपरी मदत करणार आहेत हे मात्र स्पष्ठ दिसत आहे.निवडणुक पुर्ण ताकतीनिशी लढवणार आहे अशी भावना रघुनाथ तोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. जनसामान्यांमध्ये जे बर्याच दिवसापासुन खुर्चीला चिटकुन बसलेले यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.नवीन चेहरा यायला पाहीजे ,अडिअडचणीवर मात झाली पाहीजे ,मुख्य ध्येय विकास झाला पाहीजे असा सुर निघत आहे.जनसामान्यांचा बुलंद आवाज निवडुण येणारच असं ठाम मत जनतेतुन उमटत आहे.

