केज/प्रतिनिधी
दि.15 केज तालुक्यातील मौजे नाव्होली येथे दि .14 /09/2024 रोजी नाव्होलीचा राजा सार्वजणीक गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमीत्त गावातीलच बालकिर्तनकार ह.भ.प.सार्थक महाराज देशमुख यांच्या सुश्राव्य किर्तन सेवेचा लाभ पंचकृषीतील भाविकभक्तांना दिला.देशमुख महाराजांनी आपल्या अनमोल वाणीने लोकसमुहाचा आनंद दुनावला होता. उजळले भाग्य आता || अवघी चिंता वारली ||संत दर्शनी हा लाभ ||पद्मनाभ जोडला||ध्रु|| संपुष्ट हे हृदय पेटी ||करुनि पोटी साठवूं ||तुका म्हणे होता ठेवा || तो या भावा सापडला || या तुकाराम महाराजांच्या अभंगावर किर्तन सेवा केली.तुकाराम महाराज काय सांगतात मनुष्य जन्मात माणसाला दोन वेळा महत्व आहे एक जन्माला अल्यानंतर ,दुसरे श्राध्द करताना पण तुकाराम महाराज सांगतात माझ्या जिवनामध्ये तिसरा दिवस मला संताचे दर्शन झाले त्यामुळे माझी सर्व चिंता हरली आणि संताच्या दर्शनामुळे पद्मनाभ आसा जो हरी त्याचा मला लाभ झाला. बाबाजी गुरु सांगितले नांव मंत्र दिला रामक्रष्ण हरी उपस्थीत सर्वांचे घरी झोपलेल्यांचे आभार गणपती बप्पाला फुले वाहतो वाकुन सर्वांचे नांव घेतो ज्ञानोबारायांचा मान राखुन उखाण घेउन मंत्रमुग्ध जनसमुदाय केला .

