केज/प्रतिनिधी
केज दि.07 मौजे राजेगांव येथील रहिवाशी ह.भ.प अभिषेक महाराज मेटे यांनी गांगापुर येथे ह.भ.प .राऊत बाबा महाराज यांच्या सानिध्यात राहुन नुकतेच किर्तनकार अभ्यासक्रम पुर्ण केला व आपल्या जन्मभुमीत केज तालुक्यातील मौजे राजेगांव येथे दि.06/ 11/2024 रोजी रात्री 09:00 ते 11:00 या वेळेत किर्तन सेवा केली.पवित्र सोंवळी || एक तीच भुमंडळी|| ज्यांचा आवडता देव ||अखंडित प्रेमभाव||तींच भाग्यवंते ||सरती पुरती धनवित्ते|| तुका म्हणे देवा ||त्यांची केल्या पावे सेवा ||या जगदवंदणीय ,जगदगुरु,तुकाराम महाराज यांच्या तीन चरणाच्या अभंगावरती अतिशय उत्कृष्ठ चिंतन केले.राजेगांव नगरी ब्रम्हानंदामध्ये न्हाऊन गेली.संत कसे आसतात याचे उदाहरण म्हणजे परीसबाबा,आणि नामदेवराय यांच्यातला संवाद दृष्टांताद्वारे सांगितला ,संताच्या संगती मनोमार्ग जडती आकळावा श्रीपती येणेपंथे या न्यायाने नामदेवरायाने परीसबाबा ला परचिती दिली वाळु च्या कणामध्ये परीस कुठ सापडायचा,पण नामदेवराय म्हणजे जिवंत परीस आहे या परीसाला आपल्याशी करा आसा संकल्प केला.कारण आपला परीस फक्त लोखंडाला च सोनं करतो पण नामदेवरायानेमात्र आखंड वाळवंट सोन्याचा केला. ही किर्तन सेवा ऐकण्यासाठी,विष्णुपंत महाराज लोंढे गुरुवर्य, मृदंगाचार्य ओकांर महाराज कागदे , दिपक महाराज मेटे, वानगांव फाटा भजनी मंडळ, बहुला ,पिंपळगांव( को),पिठ्ठीघाट,नाव्होली मृदंगाचार्य बंडु महाराज देशमुख ,गायनाचार्य भागवत महाराज, गायक माउली तांबडे,सर्व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
