
केज/प्रतिनिधी
दि.22 नोव्हेंबर बीड जिल्ह्यातील तालुका
परळीत बोगस मतदान रोखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड. माधव जाधव यांच्यावर २० नोव्हेंबर रोजी परळी येथे मतदाना च्या दिवशी जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच परिसरात उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनाही हल्लेखोरांकडून दमदाटी करण्यात आली.
हा प्रकार पोलीस यंत्रणेसमोर घडूनही अद्यापपर्यंत हल्लेखोरांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट, आकसापोटी उमेदवारांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हा पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही.
बीड पोलीस अधीक्षक साहेबांना माझे आवाहन आहे की, ॲड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी. अन्यथा, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, व त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी पोलीस अधीक्षकांवर असेल असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे
खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
