महाशिवरात्री निमित्त मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध
केज दि.11 मार्च तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी यात्रेनिमित्त विविध उपकरणाचे हजेरी लाभलेले दिसले त्यामध्ये सर्व लहान थोरांनी आनंद व्यक्त केला विशेषतः राहट पाळणा , ब्रेक डान्स, इंजिन रेल्वे ,स्विमिंग बोट, जम्पोडी ही सर्व साधने इंजन वर चालणारी असून यामध्ये कमीत कमी कमीत कमी 30 ते 40 लोकांचे बसण्याची व्यवस्था केलेली आहे अगदी मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी यात्रेमध्ये लहान थोरापासून सर्वजण या साधनांचा लाभ घेताना दिसत आहेत. यात्रेमध्ये ऊन्हाचा इतका कहार होता की बाहेर डोकं काढण्याची क्षमता नव्हती परंतु या साधनांमध्ये बसून कडाक्याचे ऊन सहन करत आनंद व्यक्त केला गेली तीन दिवसापासून इतकीच गर्दी दिसून येत होती .वाढलेले तापमान पाहता आईस्क्रीम कुल्फी ऊसाचा रस खाद्यपदार्थाचे स्टॉल खेळणी स्टॉल शेती उपयोगी सर्व वस्तू अवजारे अशा विविध रूपाने महाशिवरात्री यात्रा वर्षातून एकदा भरली जाते. सलग पाच दिवस ही यात्रा चालू राहते आज तिसरा दिवस होता तरी देखील गर्दी कसल्याही प्रकारची कमी नव्हती. जो तो आपल्या आनंदात मग वस्तू खरेदी करत आलेल्या साधनांचा उपभोग घेत होते. विसाव्या शतकातील महान संत श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पावन स्पर्शाने उत्तरेश्वर मंदिर देवस्थान यांनी भरपूर नियोजन केले होते .यात्रा म्हणजे पंच कृषीतील सर्व लोकांचे माहेर घर असल्यासारखे वाटते कारण सर्वजण शिदोरी घेऊन मिळेल त्या ठिकाणी जागा धरून नदीपात्रात आजू आजूबाजूला झाडाखाली बसून जेवण खाद्यपदार्थ खातात. खेळणी घेतात आनंद व्यक्त करतात आणि आपापल्या घरी जातात.
