केज/प्रतिनिधी
केज दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. पृथ्वीराज शिवाजी साठे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे दबंग खासदार मा.बजरंग बप्पा सोनवणे यांनी केज विधानसभा मतदारसंघातील चाकरवाडी, बाळापूर, आंबिलवडगाव, कुंभारी, पोथरा, सात्रा, सावरगाव घाट, अंधापुरी, वैतागवाडी या गावांना भेटी दिल्या यावेळी बोलताना लोकसभा निवडणुकीत सर्व जनतेने मला येवढे मतदान रुपी प्रेम दिले तसेच प्रेम या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राहुद्या अशी विनंती केली व त्यांच्या विनंतीला मान देऊन या भागातील जनता मागचीच पुनरावृत्ती करणार असे येथील जनतेन आश्वासन दिले.
येथील मतदारांनी खुप खुप मोठा प्रतिसाद दिला व लोकसभेच्या
धर्तीवर या विधानसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात मतदान देवून मा. पृथ्वीराज साठे साहेब यांना मोठ्या मताधिक्याने निवडुन आणु असे येथील जनतेने आश्वासन दिले या दौऱ्यामध्ये सर्व मतदार बांधवाचे मा. खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आभार मानले व चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत ज्ञॎनेश्ववर माऊली महाराज समाधीचे दर्शन घेतले.

